नाते कुंपणावरचे
ॲलन ट्यूरिंग संगणन आणि कृत्रिम बुद्धिमतेचा जनक मानला जातो. दुसरे महायुद्ध जिंकण्यात त्याचा मोठा वाटा मानला जातो. १९५२ साली, त्याच्या घरी चोरी झाली. रिवाजाप्रमाणे पोलीस आले. तपासादरम्यान ॲलन ट्यूरिंगचे त्याच्या मित्राशी शारीरिक संबंध असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्याला अटक झाली आणि त्याच्यावर खटला भरला. ट्यूरिंग दोषी मानला गेला आणि त्याला शिक्षेचे दोन पर्याय देण्यात आले …